थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तेचा १५ रोजी लिलाव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र जमीन महसुल अधिनिमय 1966 चे कलम 176 अन्वये जमीन महसुलाची वसुली करणे बाबत तरतुद आहे. त्यानुसार श्री. संजय घनश्याम शर्मा यांचेकडे करमणुक केबलची थकीत प्रलंबीत रक्कम रुपये 31,73,478/- प्रलंबीत असुन त्यानुसार प्रस्तुत थकबाकीची रक्कम पुर्णत: वसुल करण्यासाठी संबधित थकबाकीदार यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्ता त्यांची मेहरुण शिवारातील सामाईक मालकीचे नांव असलेली बिनशेती क्षेत्र गट न. 463/1व2 मधील भुखंड 4 क्षेत्र 289 पैकी 72.25 चौ. मी. वर रक्कम रुपये 31,73, 478/- अक्षरी ऐकतीस लाख त्रयात्तर हजार चारशे अठ्ठयात्तर मात्र बोजा दाखल करण्यात आलेला आहे.

करमणूक कराच्या थकबाकीचा बोजा बसवुन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील तरतुदी नुसार लिलाव करुन थकबाकीची रक्कम लिलावाच्या रक्कमेतुन वसुल करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार फेरफार क्र / 94002 दिनांक 8 जुलै, 2021 रोजी नोंद करण्यात आलेली असून 7/12 उताऱ्यावर सरकार नांव लावण्यात आलेले आहे. तरी या जागेचे 15 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय जळगाव येथे लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती लिलावातील जागा लिलावातील बोलहातची किंमत इत्यादी बाबत तहसिलदार जळगाव यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार जळगाव नामदेव पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like