दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ; १५ दुचाकी हस्तगत

बातमी शेअर करा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | चोपडा तालुक्यातील अडावद येथील दोन दुचाकी चोरणाऱ्या आरोपींकडून एलसीबीच्या पथकाने पकडून त्यांच्याकडून १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्हयांत मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना सूचना दिल्या.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, यांना दि. १० नोव्हेबर २०२२ रोजी गुप्त माहितीद्वारे बातमी मिळाली आहे की, अडावद ता. चोपडा येथील राहणारा दिपक संजय शेटे व नविद शेख इजाज हे मोटार सायकल चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अधिनस्त पोहेको गोरखनाथ बागुल, संदिप रमेश पाटील अश्रफ शेख, संदिप सावळे, पोना.प्रविण मांडोळे, परेश महाजन, रविंद्र पाटील, लोकेश माळी, भारत पाटील, प्रमोद ठाकूर अशांचे पथक तयार करून त्यांना अडावद ता. चोपडा येथे रवाना केले असता पथकाने आरोपी दिपक संजय शेटे वय २० रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा, आणि नविद शेख इजाज वय २३ रा. मनियार अळी, अडावद ता.चोपडा जि.जळगांव यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही चोपडा, अमळनेर, यावल, धुळे जिल्हयातील शिरपूर, थाळनेर व मध्यप्रदेश राज्यातील बलकवाडा जि.खरगोन येथून मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत. सदर आरोपीतांनी चोरी केलेल्या १४ गुन्ह्यांमधील एकूण १५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like