पुढच्या आठवड्यात रेल्वेचा मेगा ब्लॉक ; अनेक गाड्या रद्द
खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | मध्य रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर असणार्या मुंबईतील कर्नाक रोड ओव्हर ब्रिज काढण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे. या अंतर्गत कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करणार आहे. यामुळे अप आणि डाउन धिम्या मार्गावर १९ नोव्हेंबरला रात्री ११ पासून ते २० नोव्हेंबरला ५ वाजेपर्यंत १७ तासांचा ब्लॉक असेल.
यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने भुसावळ ते अकोला मार्गावरील गोंदिया, महाराष्ट्र, गितांजली, नागपूर दुरंतो, अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. यात २० नोव्हेंबर रोजी : मुंबई – अमरावती एक्स्प्रेस; मुंबई – हावडा एक्स्प्रेस; मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस; मुंबई – हावडा दुरांतो एक्स्प्रेस; मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस; मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम