भाजीपाला घेण्यास जाणारा व्यक्ती ट्रकच्या धडकेत ठार
खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भाजीपाला घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हातगाडी गाडी ढकलत जात असलेल्या भाजीपाला विक्रेत्या ठार झाल्याची घटना घडली . राजेंद्र रुपसिंग पाटील (वय-४०, रा. लक्ष्मीनगर, सिंधी कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे . याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जवखेडा येथील राजेंद्र पाटील हे दोन वर्षांपासून राहत असून भाजीपाला विक्री करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे हातगाडी घेवून भाजीपाला खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे निघाले. महामार्गावरुन जात असतांना अजिंठा चौफुलीजवळ मागून भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात राजेंद्र पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळहून पसार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम