तरुणीची ऑनलाईन मोबाईलद्वारे ५ लाख ४० हजारात फसवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | ऑनलाईन मोबाईलद्वारे तब्बल ५ लाख ४० हजारात शहरातील एका २९ वर्षीय तरुणीची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्या नगरातरहात असलेल्या एका २९ वर्षीय तरुणीला दि ९ व १० रोजी तिच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने व्हाटसअपवर संदेश पाठवीत तुम्हाला एका महाविद्यालयात पीएचडीची फी भरण्यास सागितले. यानंतर त्यांच्याकडून परवानगीशिवाय इंटरनेट बँकिगचे आयडी व पासवर्ड घेत बँकेतून गुप्तपणे ४ लाख ७९ हजार तर त्यांच्याकडून युपीआयहून ६१ हजार लांबविले. यानंतर फसवणूक झालेल्या तरुणीने तत्त्काळ सायबर पोलीस स्टेशन गाठून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो.नी. लीलाधर कानडे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like