महिलेस जीवे मारण्याची धमकी ; चौघांविरुद्ध गुन्हा
खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार १० ऑक्टोबर रोजी रात्री घडला असून याप्रकरणीचौघां आरोपींविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरएमएस कॉलनीतील रहिवासी रेखा सुभाष पाटील या त्यांच्या घराजवळ असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन ते चार जणांनी काही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. या वेळी अज्ञात आरोपींनी रवी देशमुख, विनोद देशमुख, जगदीश पाटील व राजेश पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच देशमुख यांच्यासह चौघांनी तुम्हाला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगत त्यांना सरेंडर होण्याचे सांगत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात रेखा पाटील यांनी रामानंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम