आयशरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
खान्देश लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | आयशर गाडीने मोटार सायकलला धडक दिल्याने ३१ वर्षीय मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सायकलस्वार भगवान विश्वनाथ उगले (वय ३१, रा. बेटावद खु. ता. जामनेर), असे मयत तरुणाचे नाव आहे.
साळशिंगी ते भानखेड़ा रस्त्यावरील करंजी पुलाजवळ शुक्रवार,दि. २५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आयशर गाडी (क्र. एम. एच. २० ईएल- २११९)ने पिंपळगावहून बेटावदकडे जाणाऱ्या मोटार सायकल (क्रमांक एम.एच.०५- टी १२१०) ने जोरदार धडक दिल्याने मोटार सायकलस्वार भगवान विश्वनाथ उगले (वय ३१, रा. बेटावद खु. ता. जामनेर) हा युवक जागीच ठार झाला.अपघात घडताच आयशर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसात आयशर चालक आकाश बनकर (वय २० रा. पान वडोद ता.सिल्लोड जि .औरंगाबाद) याच्या विरुध्द भा.द.वि. कलम ३०४(अ),२७९,४१९,सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो. कॉ.अयुब तडवी करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम