सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ |भारतीय संविधान दिनानिमित्त सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे यौमे आयने हिंद ( भारतीय संविधान दिवस) या तीन दिवसीय कार्यक्रमाचा प्रारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करून करण्यात आली.

भारतीय संविधान दिवस) कार्यक्रमाचे शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर ते रविवार २७ नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज जळगाव रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन करून भारताचे संविधान उद्देशिका चे सामूहिक वाचन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुजावर बाबा फैयाज नुरी हे होते. याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थित नागरिकांना जीवनभर संविधान व देशाप्रती प्रामाणिक राहून वाटचाल करीत राहू असे वचन घेतले. तसेच आपल्या देश बांधवांना सुद्धा संविधान व देशाप्रती बांधिलकी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करू तसेच भारतीय संविधानाने ठरवून दिलेली कर्तव्य आनंदाने व मनाने पार पाडू. याप्रसंगी जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान चिरायू होवो, संविधान के सन्मान में हम सभी भारतीय मैदान मे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

 

याप्रसंगी भारतीय ध्वज तिरंगा व एका हातात संविधान पुस्तक हृदयाला लावलेले होते. याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मुजावर बाबा फैय्याज नुरी, हाजी शेख सलीमुद्दीन, नाझीम पेंटर, हाजी सय्यद जावेद, शफी ठेकेदार, इलियास नुरी, हाजी खलील खाटीक, शेख जलालुद्दीन, डॉ. इसरार अहमद, योगेश मराठे, सुरज गुप्ता, रईस चांद, कामिल खान, वसीम खडसे, दानिश शेख, झीशान हुसैन, शेख नझीरुद्दीन, शेख मेहबूब, शाकिब फारुख, मोईन असगर, नईम शफी, नाझीम कुरेशी, शेख अब्दुल रहीम, अतिक अहमद खान, साद ताज मोहम्मद, शेख लबीब, आजम अली, शेख नूर मोहम्मद, सय्यद आसिफ, शेख रियाजुद्दीन, रहीम कुरेशी, शेख नवाझ, अयान कादरी इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like