व्हाइस ऑफ मीडियाच्या जळगाव महानगराध्यक्षपदी यावलकर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ नोव्हेंबर २०२२ | मुल्याधरित पत्रकारिता ही ही विचारधारा कायम राहावी आणि ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठी निर्माण झालेल्या व्हाइस ऑफ मीडिया या नोंदणीकृत संघटनेच्या जळगाव महानगराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर यांची नियुक्ती झाली आहे.

श्री. यावलकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्य केले असून, त्याच कामगिरीच्या बळावर व्हाईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी ही नियुक्ती केली. व्हाईस ऑफ मीडिया ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाच्या संकट काळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संघटनेने १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.

यावलकर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे ,कार्याध्यक्ष संजय आवटे ,आणि राज्य अध्यक्ष राजा माने यांनी अभिनंदन केले.
जळगाव महानगरातील कार्यरत असलेल्या सर्व पत्रकारांची प्रगल्भता वाढावी आणि वैचारिक अधिष्ठान वाढावे तसेच पत्रकारांच्या वैयक्तिक प्रश्नांची उकल व्हावी या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे भविष्यात आयोजन करण्यात येईल असे राजेश यावलकर यांनी आपल्या नियुक्ती बाबत बोलताना सांगितले.
व्हॉइस ऑफ मीडियाची जळगाव शहराची कार्यकारणी गठीत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावलकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like