कृषि पायाभुत सुविधा योजना (AIF) अंतर्गत आयोजित कार्यशाळा संपन्न
जळगाव : कृषि पायाभुत सुविधा योजना ( AIF ) अंतर्गत 5 एप्रिल, 2022 रोजी सिल्वर पॅलेस, रेल्वे स्टेशन रोड, जळगाव या ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संतोष बिडवई, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) कुर्बान तडवी, जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड श्रीकांत झांबरे, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक अरुण प्रकाश, बँक आफ बडोदा नागेश सोनवणे, विषय विशेषज्ञ (नादेकृसं प्रकल्प) संजय पवार, जिल्हा संसाधन व्यक्ती प्रशांत पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती सचिन धुमाळ, यांनी सदर एकदिवसीय कार्यशाळेस मार्गदर्शन केले.
केंद्र शासनाने कृषि पायाभुत सुविधा निधी (AIF) अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा या केंद्रीय क्षेत्र योजनेची (Central Sector Scheme ) आखणी करुन योजनेच्या मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या प्रमाणे सदरील योजनेअंतर्गत शेतावर तसेच, विविध शेतमाल संकलन केंद्राच्या ( विविध कार्यकारी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कृषि उद्योजक, कृषि र्स्टाट-अप्स इ.) मध्यम ते दिर्घ मुदतीचे कर्ज घेऊन शेतमाल काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या पायाभुत सुविधा व्यवहार्य प्रकल्पासाठी, समुह शेती मालमत्ता निर्मितीसाठी प्रोत्साहन व वित्तिय सहाय्य देणार आहे. सदरील वित्त पुरवठा योजनेअंतर्गत 2 कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व कर्जावर वार्षिक 3 टक्के व्याज सुट असेल सदर सवलत ही जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत उपलब्ध आहे. तसेच लघु उद्योगांसाठी पतहमी निधी संस्थेकडुन ( CGTMSE ) रु. 2.00 कोटी पर्यंतच्या कर्जाला पतहमी देण्यात येते. त्याप्रमाणे CGTMSE कडुन देण्यात ही सुविधा शेतकऱ्यांचा संस्थानाही मिळेल आणि यासाठी CGTMS मार्फत आकारण्यात येणारे शुल्क शासन FPO साठीच्या योजनेतुन देईल. तसेच केंद्रीय स्तरावर शेतकरी कल्याण कार्यक्रम अंमलबजावणी सहकारी संस्थे मार्फत प्रशासकीय खर्च, पिक समुहांचा विकास करणेसाठी तज्ञ संस्थांचा सेवा घेणे, प्रकल्प अहवाल तयार करणे इ. बाबींचा योजनेत समावेश बाबत मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले.
तसेच वरील योजनेअंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत पुरवठा साखळी विकासाचे प्रकल्प आणि ई – मार्केट प्लॅटफॉर्म, गोदाम उभारणी, सायलो, पॅक हाऊस, गुणवत्ता निर्धारक सुविधा, प्रतवारी सुविधा, शीतसाखळी, वाहतुक व्यवस्थापक सुविधा, प्राथमिक प्रक्रिया सुविधा, फळे पिकवणी सुविधा या घटकांचा समावेश असेल, त्याप्रमाणे सामुहिक शेती सुविधा अंतर्गत सेंद्रीय निविष्ठा उत्पादक केंद्र, जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र, काटेकोर शेतीसाठी सुविधा, पुरवठा साखळी सुविधा, पीपीपी तत्वावरील केंद्र व राज्य सरकारच्या सामुहिक शेतीसाठीच्या योजनांमधील सुविधा या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सदरील योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम