शिवाजीनगर पुलाचे काम संथ, तर पिंप्राळा रेल्वे पुलाचे काम वेगाने

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | जळगाव गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीनगर पुलाचे काम अद्यापही अंतिम टप्यात नाही, मात्र दुसरीकडे गेल्या आठवड्यात शुभारंभ झालेल्या पिंप्राळा रेल्वे पुलाचे काम मात्र गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.

जळगावात पिंप्राळा रेल्वे पूल हा मध्य व पश्‍चिम रेल्वे मार्गावर आहे. या कामाचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.अहमदाबाद येथील ‘मिरल इन्फ्रा’ कंपनीला कामाचा मक्ता देण्यात आला आहे. शिवाजीनगर पुलाप्रमाणेच या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होईल असे वाटत होते. पुलाच्या भक्कमतेसाठी एकूण १८ पीलर उभारण्यात येणार आहे. त्या पिलरचे काम तातडीने सुरू झाले असून काही पीलर जमिनीपर्यंत भरण्यात आल्याचंही दिसून येत आहे.

या कामाकरीता शिवाजीनगर भागाकडील कानळदा रस्त्याकडील दुभाजक हटविण्याचे काम चालू आहे. जळगाव येथील पिंप्राळा रेल्वे पुलाचे काम गतीने सुरू असताना शिवाजीनगर रेल्वे पुलाचे काम मात्र अद्यापही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेना शिवाजीनगर शाखेतर्फे महापालिकेत आंदोलन करण्यात आले.विशेष म्हणजे हा पुल टी आकाराचा असताना अद्याप मक्तेदाराने ‘वाय’आकाराचे कामही पूर्ण केलेले नाही.पुल सुरू होण्याचा मुहूर्त ११ फेब्रुवारी होता, तरीही विहित कालावधीत पूल का पूर्ण झाला नाही, अशी विचारणी केली आहे.

जिल्हाधिकारी यांनीही शिवाजीनगर पुलाच्या दिरंगाईबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला आहे.
पूल त्वरित सुरू होण्यासाठी कारवाई करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तरी पुलाच्या कामाला गती येऊन पूल वाहतुकीसाठी त्वरित सुरू होईल काय? याचीच प्रतीक्षा आता नागरिकांना आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like