कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांच्या रांगा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | जळगावात ७ मार्च रोजी, अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर धुळे – चोपडा रस्त्यावर दोन किलोमीटरची वाहनांची रांग लागली होती. समितीत सोमवारी मालाची विक्रमी आवक झाली.

सोमवारी ७ मार्च रोजी एका तालुक्यातच नाही तर पारोळा, चोपडा, शिरपूर, शिंदखेडा, धरणगाव आदी विविध तालुक्यातून शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता. अमळनेर बाजार समितीत मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांच्यासह आठ प्रशासक नियुक्त करण्यात आले. यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कोरोनातील आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांचा माल विक्री झाल्याबरोबर रोख रक्कम मालाचा मोबदला देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कारणांमुळे गहू, हरभरा, मका, बाजरी, कापूस, सूर्यफूल, धना आदी मालाची आवक सोमवारी बाजार समितीत झाली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर रस्त्यावर देखील वाहनांची रांग उभी होती. लिलावाच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाणी व इतर सुविधा करण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोबदला देण्याची व्यवस्था केली.सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येत होता. बाजार समितीतील व्यापारी व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने धान्य खरेदी- विक्री योग्य पद्धतीने पार पडली. शेतकऱ्यांच्या मालाला अधिकचा भाव कसा मिळेल, यासाठी संचालक मंडळाचा प्रयत्न असतो, असे प्रशासनामे म्हटले आहे.

हरभऱ्याची ७ हजार क्विंटल खरेदी झाली तर ४५४६ ते ७००० च्या मर्यादेत हरभऱ्याला भाव देण्यात आला. गव्हाला कमाल २,३४५ रुपये क्विंटल भाव देण्यात आला. ३ हजार क्विंटल गव्हाची खरेदी झाली. मक्याला १९२६ रुपये भाव होता. सुमारे १५०० क्विंटल मका खरेदी झाला. तुरीला ५६०० रुपये, सूर्यफुलास ६,८३५ रुपये भाव देण्यात आला. सोयाबीन, धने, बाजरी, दादर, ज्वारी असा एकूण १५ हजार क्विंटल माल खरेदी करण्यात आला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like