सोने चांदीच्या किमतीने गाठले ५५ हजारांचे घर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. आज पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७३० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५५,००० रुपयांवर आला आहे. जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,७७० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ७१,६१० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. मंगळवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ९८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ८३० रुपये प्रति किलोने महागली आहे. त्यापूवी काल सोने ८१० रुपयाने तर १२८० रुपयाने महागली होती.

जगात जेव्हा तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो.बऱ्याच दिवसांनंतर आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. आज 8 मार्च रोजी सोन्याचा दर 2716 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त मिळत आहे. तर, दोन वर्षांआधीच्या सर्वाधिक दरापेक्षा चांदी 5651 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे.दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like