सामान्य जनतेला पेट्रोलचा बसणार फटका, पेट्रोल डिझेल दरात १०-१५ रूपयांची होणार वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ |पुढील आठवड्यापासून देशात पट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका मध्यमवर्गीयांना बसणार आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 13 वर्षातील उच्चांकी दराने कच्चे तेल मिळत आहे.

2017 पासून खनिज तेलाच्या किंमतींचा आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार ताळमेळ घालण्यात येतो. त्यामुळं पुन्हा एकदा ग्राहकांना, जनतेला महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचा खिसा आता आणखीनचं हल्का होणार आहे. जळगाव पेट्रोल डिझेलचे दर ११०.८६/ ९२.८८ आहे. काही दिवसांमध्ये भारतामध्ये पेट्रोल-डीजल च्या किंमतीमध्ये सुमारे १०-१५ रूपयांची वाढ होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

जगभरात एवढी किंमत वाढूनही भारतामध्ये तेलाच्या किंमती मागील ३ महिन्यांपासून स्थिर आहे आणि यामागचे कारण सांगितले जात आहे ते म्हणजे, ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या निवडणुका.! युक्रेन-रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले. मात्र भारतात इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. याचबरोबर रशिया-युक्रेन संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यामध्ये अजुन भर पडणार आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया ३५-४०% टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा युरोपला करतो.

पेट्रोल डिझेलचे दर:

बीड. १११.५९/ ९४.३२

जालना १११.५८/ ९४.२२

बुलढाणा ११०.८८/९२.९६

चंद्रपूर ११०.६५/ ९३.४५

धुळे ११०.४६/ ९२.४९

गडचिरोली १११.२४/ ९३.७६

गोंदिया १११.१८/ ९४.३३

बृहन्मुंबई. १११.१६/९४.३२

हिंगोली १११.०७/९४.३४

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like