सिलिंडर स्फोटात एक ठार तर, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | जळगाव शहरातील जानकीनगर येथे झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार सायंकाळी घडली. जखमीनवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जानकीनगर येथे ८ मार्च रोजी सायंकाळी ही दुर्दैवाची घटना घडली आहे. बंसीलाल पांडे केटरिंग वाले यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात स्वयंपाक करत असलेले बन्सीलाल पांडे वय ५५ हे जागीच ठार झाले. तर बालकिशन गणेशलाल जोशी हे गंभीर जखमी झाले.जखमीला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. जळगाव महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. घटनास्थळावर आठ ते दहा सिलिंडर आढळून आले. अग्निशामक दल व नागरिकांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठी हानी टळली.

सिलिंडर स्फोटाची माहिती कळताच महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांना आधार दिला. तसेच घटनास्थळी एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस नाईक मुदस्सर काजी, किशोर पाटील दाखल झाले आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like