जळगावात शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | अवकाळी पावसाने शेतशिवारातील शेकडो हेक्टरवरील दादर, हरभरा, गहू व इतर पिके जमिनदोस्त झाली आहेत. यामुळे खरीप हंगामासोबतच आता रब्बीचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे. दोन, तीन दिवस असाच पाऊस पडला तर हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याचं दिसून आले. ज्वारी, हरबरा आणि गहू काढणीच्या तोंडावर अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांन पुढे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार तर काही भागात तिबार पेरणीचे संकट ओढवले. रब्बीचा हंगाम तरी पदरी पडेल, या आशेने बसलेल्या शेतकरी वर्गाला निसर्गाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा देत ऐन तोंडात आलेला घास हिसकावून घेतला.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसासह मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. तालुक्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री अकरापासून ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरवात झाली. रावेर : रावेर तालुक्यातील दादर, गहू जमीनदोस्त झाला असून, कापून ठेवलेल्या हरभऱ्याला रात्रीत कोंब आले तर वादळीवाऱ्याने काही ठिकाणी जमा केलेला हरभरा उडून गेला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like