आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | मेष : आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्य लाभेल.

वृषभ : आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार पुन्हा उलटू शकेल.

मिथुन : स्वार्थकडे लक्ष असुद्या. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा. मोठे आर्थिक व्यवहार टाळा .

कर्क : नवीन लघु उद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.

सिंह : नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील.

कन्या : कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घेणे गरजेचे आहे.

तूळ : वैवाहिक जिवनांत जोडीदाराच्या चूका काढू नका. आज वाहन काळजीपूर्वक चालवा. आपल्या प्रतिष्ठेस जपा.

वृश्चिक : हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क केलेत तर यशाची चव लवकर चाखू शकाल. आज दोघात तिसरा नको.

धनु : व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट कराल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल.

मकर : नोकरदार वरीष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना प्रकृती स्वास्थ लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील.

कुंभ : आज अथक परिश्रमांच्या सहाय्याने कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती राहील. दैव अनुकूल राहील.

मीन : नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. मातोश्रीं बरोबर काहीतरी मतभेद होतील

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like