बसमधून महिलेचा हार लांबविला ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I बसमधून वाडे येथे जाताना महिलेचा राणी हार अज्ञात चोरट्याने लांबवला. या प्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजश्री गणेश राजपूत (वय ३७, रा. प्रताप चौक, पाटील वाडा, चाळीसगाव) या ३ डिसेंबर रोजी वाडे येथील नातलगाकडे एस. टी. बसने लग्नासाठी जात होत्या. भडगाव बस स्थानक ते वाडे गावा दरम्यान त्यांच्याकडील ९० हजार रुपये किमतीचा ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणी हार अज्ञात चोरट्याने कपड्याच्या पिशवीतून चोरून नेला. या प्रकरणी राजश्री राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ रोजी येथील पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सचिन वाबळे हे करत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम