चाळीसगाव तालुक्यातील मुकबधीर युवतीवर अत्याचार ; तिघांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील एका गावाजवळील तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधीर तरुणीला मारहाण करीत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात मेहुणबारे पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेतील विकृत नराधमांचा कसून शोध सुरू केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 25 पीडीता मूकबधीर असून गावाजवळील एका तलावाजवळ तीन संशयीतांपैकी दोघांनी डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर त्यातील एका पिडीतेवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवार, 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते सोमवार, 5 डिसेंबरच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली.

पीडीतेने घरी येवून कुटुंबाला ही घटना सांगितल्यानंतर तिला धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिडीतेने विशेष शिक्षिकेसमोर इशार्‍याने हा सर्व प्रकार सांगितला. तसेच आरोपी समोर आल्यास त्यांना ओळखेल, असे तिने सांगितले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख हे करीत आहेत.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like