सदस्यांच्या निर्वाचक गणांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटातून निवडून द्यावयाच्या सदस्यांच्या निर्वाचक गणांची अंतिम मतदार यादी विद्यापीठाने ६ डिसेंबर रोजी सायंकाळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

 

अधिसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधींमधून सहा सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यापूर्वी विद्यापीठाने तात्पुरती आणि त्यानंतर दुरुस्त मतदार यादी प्रसिध्द केली होती. या बाबतीत अपील करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्याअनुषंगाने विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झालेल्या अपीलावर कुलगुरुंनी अंतिम निर्णय घेतला असून व्यवस्थापन प्रतिनिधींच्या निर्वाचक गणांची अंतिम मतदार यादी मंगळवारी विद्यापीठाचे संकेतस्थळ आणि प्रशासकीय इमारतीमधील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अपीलासंदर्भात कुलगुरुंनी घेतलेला निर्णय हा अंतिम आहे असे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विनोद पाटील यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like