लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर नववधू झाली फुर्रर !

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर पतीला मुंबई येथे घेऊन गेलेली नववधू दादर स्टेशनवरूनच पसार झाली. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पिडीत पतीने शनिपेठ पोलिसात दिली आहे. त्यानुसार मध्यस्थ व पळून गेलेली महिला या दाेघांविरुद्ध साेमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झालेल्या प्राैढ फरसाण व्यापाऱ्याने दुसऱ्या लग्नासाठी मध्यस्थाला अडीच लाख रुपये देऊन बेळगाव येथून मुलगी (३३ वर्षीय महिला) जळगावात आणून तिच्या साेबत लग्न केले; परंतु नातेवाइकांची आठवण येते म्हणून लग्नानंतर पाच दिवसांत व्यापाऱ्याला दादर येथे घेऊन गेलेली नववधू स्टेशनवरूनच पसार झाली.

कांचननगरातील शैलेंद्र किसनलाल सारस्वत (वय ४६) यांनी लग्नासाठी बेळगाव येथून मुलगी आणून देण्यासाठी परिचित प्रकाश साेनी (रा. बेळगाव) यांना २ लाख ६१ हजार रुपये दिले हाेते. त्यानंतर बेळगाव येथे एप्रिल महिन्यात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत पडल्यानंतर मे महिन्यात अपर्णा चंद्रकांत नाईक (वय ३३, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हिच्यासाेबत शैलेंद्र सारस्वत यांचे जळगावात लग्न लागले. पहिल्या दाेन-चार दिवसांतच तिने करमत नाही, नातेवाइकांची आठवण येते असे सांगून सारस्वत यांना दादर येथे घेऊन गेली. दादर रेल्वे स्टेशनवरून अपर्णा पसार झाली. याप्रकरणी शनिपेठ पाेलिस ठाण्यात प्रकाश साेनी व अपर्णा नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like