जामनेर तालुक्यातील महिलेचा विनयभंग

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेला बदनामी करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात बुधवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मेणगाव येथे २४ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास महिला घरी एकटी असताना गावात राहणारा कृष्णा वसंता गवळी हा महिलेच्या तिच्या घरात अनधिकृतपणे घुसला. महिलेचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तसेच वेळोवेळी रस्त्याने तिचा पाठलाग करून बदनामी करण्याची धमकी दिली. हा प्रकार तिने नातेवाईकांना सांगितला, या संदर्भात बुधवारी ७ डिसेंबर रोजी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कृष्णा वसंता गवळी यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like