अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले
खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I शहरातील तांबापुर परिसरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवार ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तंबापुर परिसरातील एका भागात अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने दिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी बुधवार ७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम