१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळविले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  नशिराबाद गावात एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार ६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना यावल तालुक्यातील अट्रावल येथील योगेश अरुण देशमुख याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवार ७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी योगेश अरुण देशमुख रा. अट्रावल ता. यावल याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like