भुसावळात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | शहरातील वाल्मीक नगर भागातील रहिवासी असलेल्या विवाहितेचा प्रसुतीदरम्यान प्रकृती खालावल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आरती सचिन कंडारे (28, वाल्मीक नगर, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आरती या सहा दिवसांपूर्वी प्रसुती झाल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील रीदयम रुग्णालयात उपचारार्थ हलवले असता उपचार सुरू असताना शनिवार, 12 रोजी 8.35 वाजेपूर्वी त्यांचा मृत्यू ओढवला. तपास हवालदार नेव्हील जॉर्ज बाटले करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम