जळगावात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करताच घरातील व्यक्तींनी आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी पलायन केल्याची घटना शहरातील अजय कॉलनीत घडली असून सुरक्षा रक्षक श्वानाला बाहेर घेऊन गेल्यानंतर दरोडेखोर आत घुसल्याची माहिती समोर आली आहे. किरण बच्छाव हे जळगाव जिल्ह्यातील वाहन क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असून त्यांच्या घरात दरोड्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव हे १४ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पत्नी व मुलाचे जेवण अटोपल्यावर सौ.बच्छाव स्वयंपाक घरात असतांना नऊ वाजेच्या सुमारास घराच्यादरवाजाची बेल वाजली.सौ.बच्छाव यांनी दार उघडताच दोन तरुणांनी कुत्रा फिरवायला गेलेले तुमचे वॉचमन काका रस्त्यावर चक्कर येवुन पडले असल्याचे सांगितले. यानंतर सौ. बच्छाव यांनी दार उघडताच हातात पिस्तूल, चाकूसारख्या शस्त्रासह तोंडावर मास्क लावलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी एकामागून एक घरात प्रवेश केला.किरण यांना पिस्तूल लावून हातपाय बांधत असतांनाच अचानक आरडा ओरड झाल्याने दरोडेखोरांनी घरातून पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती पेालिसांना दिल्यावर उपविभागीय पोलिस अधीकारी संदिप गावीत यांच्यासह गुन्हेशाखा, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पेालिस ठाण्याचा फौजफाटा बच्छाव यांच्या घरी धडकला. परिसराची पहाणी करत असतांना दरोडेखोर पळून गेलेल्या रस्त्याने एका ठिकाणी बॅग मिळून आली असून त्यात मिरची पुड, दोर्‍या आणि दरोड्याचे साहित्य हतोडी, स्क्रु ड्रायवर मिळून आले . रात्री उशिरा पर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like