दुकान खाली करण्याच्या रागातून एकावर विळ्याने वार
खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | दुकान भाड्याने घेतले असल्या ते खाली करून देण्याबाबत विचारले असता याचा राग येऊन भाडेकरूची विळ्याने वार करून एकास जखमी केल्याची घटना सावदा येथे घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरेश उर्फ रामा सुभाष होले यांच्या काकांचे दुकान हे किरण प्रभाकर निंबाळे आणि आनंद रवींद्र जगताप या दोघांनी भाड्याने घेतलेले आहेत. हे दुकान ते खाली करत नसल्याने रामा होले यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. यामुळे किरण निंबाळे यांनी रिक्षातून विळा आणून त्यांच्यावर वार केला. तर आनंद जगताप यांनी त्यांना पकडून ठेवले. या झटापटीत रामा होले यांच्या मनगटाला विळ्याच्या वारामुळे जखम झाली.
ही घटना सावदा शहरातील सर्वज्ञ फर्निचर या दुकानाच्या समोर सायंकाळी घडली. रामा सुभाष होलेयांनी सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम