दळवेल येथे मारहाण करून महिलेचा विनयभंग ; दोघांवर गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | किरकोळ कारणावरून महिलेच्या आई-वडिलांना मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना पारोळा तालुक्यातील दळवेल येथे उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पारोळा तालुक्यातील दळवेल येथे ३५ वर्षीय महिलापरिवारासह राहते. दरम्यान महिलेच्या मुलीने अंगणात पाणी फेकल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे विठ्ठल पाटील व धनराज पाटील यांनी महिलेसह तिचे आई-वडील यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर आवराआवर करण्यासाठी महिला गेले असता तिचा साडी ओढून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सफौ इकबाल शेख तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like