भुसावळात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | शहरातील एका अल्पवयीन ,उलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राज लोणारी याने अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला विश्वासात घेवून तापी नगर भागात स्टुडीओत नेत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. तसेच अत्याचार केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केला.
तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुन १५९/२०२२ कलम ३७६,३५४(ड)४४८,५०६ बाल लैगिंक अत्याचार कलम ४,८,१२ प्रमाणे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like