सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त पाडळसरेत एकात्मता दिवस साजरा

बातमी शेअर करा

गौरवकुमार गुर्जर / पाडळसरे

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | स्वतंत्र भारतातील सर्व संस्थाने एकत्र करणारे एकसंघ भारताचे शिल्पकार व पहिले उपपंतप्रधान भारतरत्न, गुर्जर भूषण लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवसाचे आयोजन पाडळसरेत शिवसरदार ग्रुप उत्सव समिती तर्फे करण्यात आले होते, राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त हनुमान मंदिराच्या मुख्य प्रांगणात बांधण्यात आलेल्या शिव सरदार स्मारकाचे सायंकाळी शिवसरदार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुर्जर , युवा मंडळाचे निलेश गुर्जर यांच्या हस्ते शिवसरदार स्मारकाची फीत कापूस लोकार्पण करण्यात आले , निलेश पाटील ,निवृत्ती गुर्जर ,अलोक गुर्जर यांनी प्रतिमापूजन, माल्यार्पण करून श्रीफळ वाहून फेटेधारी युवकांनी अभिवादन करत आकर्षक रोषणाईने फटाक्यांची आतीष बाजी करून जयंती साजरी करण्यात आली ,उपस्थित ५०० युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासमोर राष्ट्रीय एकात्मता व व्यसनमुक्तीची शपथ घेतली
कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य भागवत गुर्जर , राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण पाटील ,शांतता समितीचे सदस्य पत्रकार वसंतराव गुर्जर , शिरीष चौधरी मित्र परिवाराचे रणछोड गुर्जर , माजी सरपंच सचिन पाटील , उपसरपंच शिवाजी पाटील ,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख चंद्रशेखर पाटील ,विभाग प्रमुख ईश्वर पाटील ,विकास सोसायटीचे चेअरमन मंगल गुर्जर ,शांताराम पाटील,सुनील गुर्जर ,जेष्ठ नागरिक काशीनाथ पाटील ,डॉक्टर अविनाश गुर्जर ,माजी सरपंच रमेश पाटील,जगदीश भदाणे यांची विशेष उपस्थितीत होती
यावेळी उपस्थित युवावर्गाकडुन ” जय सरदार” भारत माता की जय ! जय शिवराय , अखंड भारत चिरायू होवो, अश्या घोषना देत युवकांनी परिसर दनानून काढला. कार्यक्रम स्थळी भगव्या पताका व ध्वज लावल्याने व सरदार पटेल नवयुवक मडळाचे कार्यकर्त्यांनी व प्रमुख मान्यवरांनी फेटे परिधान करून वेगळे आकर्षन निर्माण केले होते , नृत्य नाटिका सादरीकरण करून वातावरण देशभक्तीपर निर्माण करून उपस्थितांचा उत्साह वाढवला.शिव सरदार जयंती उत्सव समितीचे संदीप गुर्जर , भोलेनाथ पाटील, राकेश गुर्जर,संजय गुर्जर , बाळासाहेब गुर्जर,निलेश गुर्जर ,डॉक्टर अविनाश पाटील , गौरवकुमार गुर्जर,लोकेश गुर्जर ,दिपक गुर्जर,राज गुर्जर ,सागर गुर्जर ,समाधान गुर्जर ,कल्पेश गुर्जर ,चंपालाल गुर्जर ,भरत गुर्जर ,हरीश पाटील ,मणीलाल गुर्जर, अक्षय गुर्जर,खुशाल भदाणे, रितेश गुर्जर,विकास गुर्जर ,मनोज गुर्जर , बाबा गुर्जर, पिटु गुर्जर,राधेश्याम गुर्जर आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like