शिवाजीनगरवासियांच्या समस्यां सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | शिवाजीनगरमध्ये उतरणाऱ्या उड्डाणपुलाचे (T आकार ) काम व इतर कामे पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख शिवसेना छत्रपती शिवाजीनगर विजय संजय राठोड यांनी शिवाजीनगरवासीयांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाम्हटले आहे कि स्थानिक रहिवाशांसाठी पुलावरून ये-जा करण्यासाठी जिन्याची व्यवस्था करावी. शास्त्री टॉवर कडील व शिवाजीनगर भागाकडील पुलाच्या दोन्ही बाजूचे समांतर रस्ते हे लवकरात लवकर खडीकरण व डांबरीकरण करून मिळावे. छत्रपती शिवाजी नगर भागाकडील उड्डाणपुलाला लागून असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रोड वाइंडिंग मध्ये येत असून तो सुशोभीकरण करून उंच करण्यात यावा. शिवाजीनगर भागाकडून कानळदा रोडकडे जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दोन्ही जिनिंगच्या भिंतींचे वाइंडिंग करून मिळावे. शिवाजीनगर भागाकडील बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास स्थानिक रहिवासीतर्फे तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर भूषण कोळी, अरुण शिंदे, जमील से. महमुद , उमर अब्दुल सयद शेख, अनिता देवरे, पार्वती गवळी, लीलाबाई गवळी, रियाज असगर आदींच्या स्वाक्षरी आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like