ऑर्थोपेडीक सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा ४ रोजी शुभारंभ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | प्रख्यात मणका विकार तज्ञ डॉ. अजय कोगटा, डॉ. दिपक अग्रवाल यांचे ऑर्थोपेडीक सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा शुभारंभ संजिवन हॉस्पीटल शिवराम नगर मिनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स जवळ एम जे कॉलेज रोड जळगाव ४ रोजी येथे होत आहे.
आठवड्यातील दर मंगळवार व शुक्रवारी जळगाव शहरात प्रख्यात मणका विकार तज्ञ डॉ. अजय कोगटा, डॉ. दिपक अग्रवाल यांची सेवा या क्लिनिकमध्ये सांयकाळी ५ ते ७ या वेळेत उपलब्ध राहणार आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून आता मणक्याची गादी, फ्रॅक्चर, स्पाँन्डीलायसिस, स्पाईनल स्टेनोसिस, हातापायाला मुंग्या येणे, सायटिका, अपघातग्रस्त रूग्ण, गुडघा व खुबा बदल अशा रूग्णांना जळगाव जिल्ह्यातच अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे. यासाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ऑपरेशन थिएटर व तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यातच आली. याचबरोबर तज्ञ फिजिओथेरेपीस्ट देखिल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. क्लिनिकच्या माध्यमातून मिळणार्‍या सुविधांमुळे आता रूग्णांना मुंबई पुणे जाण्याची गरज राहणार नाही.
हाडांचा ठिसूळपणा शिबीर
याचदिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत हाडांचा तपासणी शिबिर आयोजित केले असून जापानची अत्यााधुनिक बीएमओडीओ ७०००एस यंत्राव्दारा मोफत तपासणी केली जाणार आहे. तपासणी सोबत संगणीकृत रिपोर्ट दिला जाणार आहे. जर आपले वय ३५ किंवा त्यापेक्षा जास्त असेल व वारंवार कंबरदुखी, पाठदुखी व सांधेदुखीचा त्रास होत असेल. फार दिवसापासून औषधे घेत असाल, थायरॉइड असेल, आपण जर धूम्रपान, मद्यपान इ. व्यसन करत असाल तर त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. वरील प्रमाणे त्रास होत असेल तर आपणास लगेच तपासणी करणे आवश्यक आहे. ह्या शिबीरामध्ये मोफत तपासणी करून योग्य तो सल्ला देण्यात येईल. तरी गरजू रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like