दारू न दिल्याने बियर बार हॉटेल मालकाला दोघांची मारहाण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | दारूची बाटली न दिल्यामुळे याचा राग येऊन दोन जणांनी बियरबार हॉटेलच्या मालकाला मारहाण करत जबरी खिशातील २३ हजार रुपयाची रोकड व सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना तालुक्यातील दहिवद चिंचगव्हाण फाट्यासमोर असलेल्या बियर बार हॉटेल जवळ घडली . याबाबत मेहुनबारे पोलीस स्टेशनला दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संजय नागराज पाटील (वय ४८ रा. दहिवद ता. चाळीसगाव) यांचे कुणाल बियर बार नावाचे हॉटेल चाळीसगाव ते धुळे रोडवर असलेल्या दहिवद-चिंचगव्हाण फाट्यासमोर आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास संजय पाटील हे हॉटेलमध्ये झोपलेले असताना त्या ठिकाणी भूषण प्रभाकर वाघ व अमृत वाल्मीक वाघ दोघे रा. दहिवद ता.चाळीसगाव हे दोघेजण येऊन त्यांनी दारूच्या नशेत येऊन हॉटेल मालक संजय पाटील यांना दारूची मागणी केली. परंतु संजय पाटील यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी संजय पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील २३ हजार रुपयांची रोकड व हातातील सोन्याची अंगठी जबरी काढून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like