गणेश कॉलनी परिसरात घरफोडी ; १६ हजाराचा ऐवज लंपास
खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | बंद घर फोडून घरातून १५ हजार ७५० रुपये किमतीचे भांडे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार गाईंशी कपलनीत उघडकीस आला असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू नगर पुतळा पार्क, गणेश कॉलनी, येथील रहिवाशी मधुकर गणपत नेहते (वय-70, हे ३ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे गेल्याने त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून १५ हजार ७५० रुपये किंमतीचे भांडे चोरून नेले. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम