हिवरखेडा येथे एकास मारहाण करून धारदार शस्त्राने केले जखमी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | फटाके फोडण्याच्या कारणावरून एकाला मारहाण करून धारदार वस्तूने जखमी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात घडली असून याबाबत पहूर पोलीस स्टेशनला २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हिवरखेड येथील रहिवाशी चरणसिंग पाटील यांच्या शेजारी राहणारे अरविंद मोहनसिंग पाटील आणि वीरेंद्र अरविंद पाटील हे राहतात. १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता फटाके फोडण्याच्या कारणावरून चरणसिंग यांनी लांब मात्र फटाके फोडा असे सांगितले. याचा राग आल्याने अरविंद पाटील आणि वीरेंद्र पाटील या दोघांनी चरणसिंग पाटील यांना बेदम मारहाण केले. त्यानंतर एकाने हातातील धारदार वस्तूने डोक्यावर वार करून गंभीर करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक हंसराज वाघ याबाबत पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like