रोझोदा शिवारातीन महावितरणच्या अल्युमिनियमच्या तारांची चोरी
खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | महावितरण कंपनीचे ६ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार चोरी झाल्याचा प्रकार रावेर तालुक्यातील रोझोदा शिवारातील शेतात घडला असून याबाबत सावदा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय रावजी नेहते यांचे रोझोदा शिवारातील शेतात असलेल्या लोखंडी खांब्याजवळ महावितरण कंपनीचे ६ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे ३० ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीला आले महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोरख रामचंद्र बेलदार (वय 34 रा. सावदा ता. रावेर) यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक विनोद तडवी करीत आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम