किनगाव येथून दुचाकी चोरट्यांना अटक
खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ | दुचाकी चोरी केल्याप्रकरणी दोन दुचाकी चोरट्यांना यावल पोलिसांनी यावल तालुक्यातील किनगाव गावातून अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
किनगाव, ता.यावल येथून चिंचोली येथील देवेंद्र अशोक साळुंखे हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.के.1239) ने 11 ऑक्टोंबर 2022 रोजी बाजाराला आले असता गावातील बाजीराव नगरातील आठवडे बाजारातून दुचाकी लांबवण्यात आली होती. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा गुन्हे शाखेने नवीद शेख एजाज (रा.मन्यार अळी, अडावद, ता.चोपडा) व दीपक संजय शेटे (रा.प्लाट भाग, अडावद) यांना अटक केली होती. आरोपींनी किनगावातुन दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर आरोपींना यावल पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम