21 रोजी ऑनलाईन स्वयंरोजगाराच्या संधी विषयावर सत्राचे आयोजन
खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ |जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयामार्फत गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 12 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मार्गदर्शन सत्रात जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव चे श्री.आर.आर.डोंगरे सर, हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यांत आलेले आहे. गुगल मिट लिंक खालीलप्रमाणे
गुगल मिट लिंक-meet.google.com/nqp-jjir-ssj-Up tp 100 guest connections
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त युवक / युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम