व्यवस्थापन प्रतिनिधींची तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी व्यवस्थापन प्रतिनिधींची तात्पुरती निर्वाचक गणाची यादी (तात्पुरती मतदार यादी) विद्यापीठाने दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रसिध्द केली असून याबाबतीत काही दुरूस्ती, आक्षेप/हरकती असतील तर ते नोंदविण्यासाठी २३ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. व्यवस्थापन प्रतिनीधींच्या गटामधून अधिसभेवर ६ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. या बाबतीत निर्वाचक गण तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून यापूर्वीच अधिसूचना जारी करण्यात आली होती.

या अनुषंगाने विद्यापीठाने व्यवस्थापन प्रतिनिंधींची तात्पुरती निर्वाचक गणांची यादी (तात्पुरती मतदार यादी) गुरूवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील नोटीस बोर्डावर प्रसिध्द केली आहे. संबंधितांनी या यादीचे अवलोकन करून आपल्या नावासमोर काही दुरुस्ती /बदल किंवा काही हरकत /आक्षेप असल्यास त्यासंदर्भात आपला लेखी अर्ज आवश्यक त्या पूरक कागदपत्रांसह दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या निवडणूक शाखेत (कक्ष क्रमांक ४१०) प्रत्यक्ष सादर करावा. विहित तारीख वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी असे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like