जी-२० परिषदेचे अध्यक्षपद हा भारताच्या विश्वबंधुत्व भूमिकेचा जागतिक सन्मान – खा उन्मेष पाटील

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ |ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षा, आणि विश्वकल्याण या त्रिसूत्रीचा मंत्र देऊन जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दिलेल्या बंधुत्वाच्या संदेशातून भारत जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य हा विचार देवून विश्व कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला असून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत बजावलेल्या भूमिकेचा भारतीय म्हणून आम्हास अभिमान वाटतो, अशा शब्दांत जळगाव लोकसभेचे भाजपचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज जी-२० शिखर परिषदेतील भूमिकेबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

 

आजचे जग सामुहिक नेतृत्वाकडे आशादायी नजरेने पाहत आहे. अशा परिस्थितीत जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे आल्याने एक जद, एक ऊर्जा, एक सूर्य या पंतप्रधान मोदी यांच्या आग्रहास जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे, असे ते म्हणाले. जी-२- चे अध्यक्ष म्हणून भारताची, पर्यायाने पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. भारत एकीकडे विकसित देशांशी घनिष्ठ संबंध ठेवून आहे आणि सोबतच विकसनशील देशांचा दृष्टिकोन देखील योग्य प्रकारे समजून घेत आहे. याच आधारावर जी-२० अध्यक्षपदाची रूपरेखा जागतिक दक्षिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल साउथ’च्या देशांच्या सर्व मित्रांसोबत मिळून बनविण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचेही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी स्वागत केले.

या जगात कोणीही फर्स्ट वर्ल्ड किंवा थर्ड वर्ल्डचे न राहता सर्व जण एकाच जगातले असतील, ही पंतप्रधानांची भूमिका भारताच्या वसुधैव कुटुम्बकम या प्राचीन परंपरेशी सुसंगत अशी असून आता संपूर्ण जगाने या परंपरेचा पाईक होऊन हातात हात घालून भविष्याची आणि विकासाची वाटचाल करावी हा पंतप्रधानांचा उद्देश स्वीकारल्याचे संकेतही या परिषदेतून मिळाले आहेत. आता संपूर्ण जगाला एका सामायिक उद्देशासाठी, एका उज्ज्वल भविष्यासाठी, सोबत आणण्याच्या दृष्टीकोनातून भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ येईल.असा विश्वास खासदार उन्मेशदादा पाटील त्यांनी व्यक्त केला. एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य हा विचार पंतप्रधानांनी जी-२० परिषदेत दिला. हा विचार, हात संस्कार विश्व कल्याणाचा मार्ग प्रशस्त बनवेल ही भारताची भावनाही पंतप्रधानांनी या परिषदेत ठामपणे मांडली, असे खासदार उन्मेश दादा पाटील म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे जागतिक विकासासाठी भारताची उर्जासुरक्षासुद्धा महत्वाची आहे. खतांचा तुटवडा हे अन्नसुरक्षेपुढील आव्हान असल्याने खते व धान्ये यांची पुरवठासाखळी हमखास अखंड राखण्यासाठी आपल्याला परस्परांमध्ये सहमतीचा करार राबविण्यावरही पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनास जागतिक पाठिंबा मिळत असल्याने भारताची मान जगात उंचावली आहे. असे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like