एमआयडीसीतील चोरीच्या दोन संशयितास अटक
खान्देश लाईव्ह | ३० मार्च २०२२ | जळगावात एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील श्रीराम पॉलिमर्स या चटई कंपनीत चोरीच्या घटना घडल्या होत्या.यावरून तपासा दरम्यान चोरी करणारा दुसऱ्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
आकाश उर्फ बंटी अंकुश जाधव वय २४ असे अटक केलेल्या संशियताचे नाव आहे. यापूर्वी देखील श्रीराम पॉलिमर्स या चटई कंपनीत उपेश उर्फ साई सोनाजी आठे याला अटक केली होती. आकाश चोरी करून बेपत्ता झाला होता.
गुप्तदाराच्या सहायाने आकाश एमआयडीसीत आल्याची माहिती सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गणेश शिरसाळे व विकास सातदिवे यांनी मंगळवारी त्याला अटक केली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम