अल्पवयीन मुलीवर ११ वीतील दोन विद्यार्थ्यांनी केला विनयभंग

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० मार्च २०२२ | यावल तालुक्यात शाळेत शाळकरी मुलीचा फोटो काढून दोन जणांनी विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय.

यावल तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.
मंगळवार २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलगी ही गावातील शाळेच्या पायरीवर बसलेली असतांना गावातील दोन ११ वीतील अल्पवयीन विद्यार्थी आले. यापैकी एकाने हात पकडला आणि दुसऱ्याने फोटो काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घडलेली घटना अल्पवयीन मुलीने पालकांना सांगितली. पिडीत मुलीसह कुटुंबियांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून दोन्ही अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like