तोंडापूरात बिबट्याचा बैलावर हल्ला, ५०० मीटरपर्यंत ठस्से

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० मार्च २०२२ | तोंडापूर गावाच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये शेतात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाला आहे. तोंडापूर परिसरात दुबार पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यात.

शिकारीच्या शोधात अजिंठा डोंगररांगामधील वन्यप्राणी मुक्तपणे वावरत आहेत. जामनेर रस्त्यावर दिवसाढवळ्या गावकऱ्यांना बिबट्या आढळून आल्यास तक्रारी करण्यात आल्या होत्या. तोंडापूर गावाच्या शेजारी असलेल्या शेतकरी अंसार कय्युम पटेल याच्या शेतात झाडाच्या खाली बांधलेल्या जनावरांपैकी एका बैलावर बिबट्याने हल्ला करून ५०० मीटर अंतरावर ओडत नेवून फडशा पाडला.

शेतात सकाळी गुडू पटेल हे शेतात गेले असता झाडाखाली बांधलेल्या बैल गायब असल्याचे लक्षात आले. शेतात शोधले असता ओडत नेल्याच्या खुणा आधळल्या त्या मार्गाने गेल्यावर मक्‍याच्या शेतात बैल आढळून आला. तसेच बिबट्याच्या पायाचे ठस्से दिसून आले.तात्काळ वनविभागाचे कर्मचारी यांना माहिती देण्यात आली असता त्याच्याकडून पंचनामा करण्यात आला.

याच शेतातून गेल्या दोन दिवस अगोदर एक बकरी गायब झाली असून त्या बकरीची शिकार करण्यात आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र बकरीचे अवशेष आढळून आले नसल्याने पुरावा नसल्यामुळे पंचनामा उल्लेख करण्यात आला नाही. घटनेचा वनविभागातर्फे पंचनामा करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like