अवैध देशीदारू वाहनातून दोन लाखाची दारू जप्त, तर तिघांना केली अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ | आजही देशी दारूची वाहतूक आणि विक्री होताना दिसत आहे. जळगावात शिरपूर येथून मध्यप्रदेश कडे अवैधरित्या देशी दारू घेवून जाणाऱ्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. यावल पोलिसांनी ज्यात देशी दारू किंमत २ हजार ८८o व किंमतीचा जप्त करण्यात आला.

शिरपूरकडून मध्य प्रदेश सोमवारी रात्री अवैधरित्या देशी दारू एका वाहनाद्वारे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांना मिळाली. या वाहनाचा शोध घेण्याकरता पोलीस अधिकारी आणि फौजी घेऊन कार्यरत झाले. त्या वाहनाचा आत्ता लागण्या करिता कडी व्यवस्था करण्यात आली. त्यानी पोलीस स्थानकात तातडीने सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सहाय्यक फौजदार अस्लम खान, हवलदार बालक बाऱ्हे, सुशिल घुगे, राहुल चौधरी, निलेश वाघ यांना पारख ठेवण्यासाठी नेमण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार कडून मध्य प्रदेशात सायकाळी बुरुज चौकात वाहन तपासनी करण्यात आली असता शिरपूर कडून ( एमएच ०१ बिडी.९१२४ ) या कारच्या डिक्कित अवैधरित्या देशी दारू आढळून आली. वाहन अडीच लाख असा एकूण दोन लाख ५२ हजार ८८० ,देशी दारू किंमत २ हजार ८८o व किंमतीचा जप्त करण्यात आला. टाँगो पंच या देशी दारूच्या ४८ बाटल्या मिळाल्या आहेत.तर वाहनातील अतुल अरुण मानकर, शुभम नरेद्र मावळे, रा. पिंपळगाव ता. जळगाव जामोद व निलेश सुभाष बेलदार रा. दापोरा ता. जि. बऱ्हाणपूर म.प्रदेश या दिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी यावल स्थानकात तिघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अस्लम खान करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like