जळगावात जुने बीजे मार्केटमध्ये लागली भीषण आग

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ |  दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. तर जळगाव शहरात आग लागण्याच्या घटना सुरूच असून अशीच एक घटना आज जळगावात जुने बीजे मार्केटमध्ये खतांच्या दुकानाला आग लागली. शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली.

जळगाव शहरातील जुने बी.जे. मार्केटमध्ये तळमजल्यावर असलेल्या श्रीराम समर्थ ऍग्रो या खत विक्री दुकानात बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने

अग्निशमन दलाचे कर्मचारी कर्मचारी संतोष तायडे, देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. परिसरातील मोठी हानी टळली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like