आजचे राशिभविष्य, जाणून घ्या आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ | मेष:- कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठा वाढेल. शुभ समाचार समजतील. संततीला वेळ आणि योग्य सल्ला द्यावा लागेल.

वृषभ:- अनामिक भीती दाटून येईल. आरोग्याची काळजी घ्या. हुरहूर वाटेल. घरातील कामेआधी मार्गी लावावी लागतील. उष्णतेचा त्रास होईल.

मिथुन:- सुखाचा दिवस आहे. कामानिमित्त फिरावे लागेल. नवीन जबाबदारी अंगावर येईल. प्रवास कार्यसाधक होतील. विक्री व्यवसायात वाढ होईल.

कर्क:- खर्चात वाढ संभवते. वादविवाद टाळा. कुटुंबास वेळ द्याल. कलाकारांना यश मिळेल. संवादातून लाभ होतील.

सिंह:- आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. आप्त भेटतील. मेजवानीच प्रसंग येतील. नातेवाईक भेटतील.

कन्या:- फारसा अनुकूल दिवस नाही. निर्णय चुकण्याची शक्यता आहे. प्रगती होईल मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

तुळ:- लाभदायक दिवस आहे. आर्थिक प्राप्ती होईल. कामे मार्गी लागतील. परिस्थिती संयमाने हाताळावी लागेल. यश मिळेल मात्र काहीशी वाट बघावी लागेल.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ नाराज होऊ देऊ नका. उपासना लाभदायक ठरेल.

धनु:- कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. मन शांत ठेवा. उच्च शिक्षणात यश मिळेल. मात्र मेहनत वाढवावी लागेल.

मकर:- दिवस प्रतिकूल आहे. रोजची कामे चालू ठेवा. नवीन धाडस नको. काळजी घ्या. सरकारी कामात लक्ष घाला.

कुंभ:- खर्चात वाढ संभवते. कामानिमित्त भ्रमंती होईल. अचानक जबाबदारी येऊन पडेल.जोडीदाराला विश्वासात घ्या.

मीन:- मन आनंदी राहील. उत्तम लाभ मिळतील. कामाला वेग येईल. आर्थिक प्रगती होईल. कामाचा वेग वाढेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like