दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी झाली तारांबळ
खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | जिल्ह्यात दहावी बोर्डाच्या परीक्षांना मंगळवार १५ मार्च पासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बसेस व खाजगी वाहने वेळेवर न मिळाल्याने बहुतांश विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिराने पोचले, त्यामुळे विद्यार्थांची केंद्रावर पोचून आरोग्य तपासणीवेळी अनेकांची धांदल तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे. त्याच शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. जिल्ह्यात ७६१ केन्द्रावर ५७ हजाराहून अधिक विद्यार्थी १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत. जिल्ह्यात तसेच राज्यात गेल्या चार महिन्यापासून एसटी बसेसचा संप सुरु असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णता कोलमडली आहे.त्यामुळे दहावीचे विद्यार्थी जसे जमेल तसे मिळेल त्या वाहनाने परीक्षा केंद्र गाठण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसून आले.
शहरातील ला.ना. सार्वजनिक विद्यालय, मानवसेवा मंडळ संचलित विद्यालयात विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी तसेच सॅनिटाईझेशन करण्यात येत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यावेळी बहुताश विद्यार्थी वेळेत पोचले, तर बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्याना वेळेवर वाहने नसल्याने त्यांच्या दृष्टीने परीक्षाच ठरली. आदी प्रकिया पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी यावर्षी नेहमीप्रमाणे ३ तास परीक्षेच्या वेळेपेक्षा अर्धा तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम