राज्यातील तापमानाने गाठली चाळिशी , जाणवू लागले उन्हाचे चटके

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान ३८ अंश नोंदविले गेले. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके लागू लागले आहे.गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या वाढीनंतर आज तापमानाने चाळीशी गाठली.यामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.येत्या आठवडाभरात अशाच प्रकारचे तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात राज्यासह जिल्ह्यावर अवकाळीचे संकट आले होते. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदविली गेली होती. मात्र त्यानंतर कमाल तापमानात वाढ होत असल्याचे दिसतेय. १५ मार्च, मंगळवारी तापमान ४० अंशांवर, तर बुधवार पर्यंत चाळिशी पार करेल. २१ मार्चपर्यंत ४४ अंशांपर्यंत तापमान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.शनिवारपर्यंत तापमान कमाल 36 तर किमान 18 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.गुजरातमधून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे संपूर्ण मध्य प्रदेशात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी जळगाव शहरासह जिल्ह्यात ३८ अंश तापमान नोंदविले गेले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like