होळी सणाच्या निमित्ताने सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट
खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ | बुधवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी दर स्वस्त झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा वाढल्याने सोने-चांदी दरात ग्लोबल लेवलवर कमजोरी आहे.हफ्त्याच्या सलग पाचव्या दिवशी सोने आणि चांदी च्या किंमतीत घसरण झाली. दोन आठवड्यात सोन्याचा भाव जवळपास ४००० रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीच्या भावात ६५०० ते ७००० हजार रुपयाची वाढ झाली होती.
मंगळवारी सोने ४४० रुपये आणि चांदी १२१४ रुपयांनी स्वस्त झाली. या घसरणीनंतर सोने ५२००० प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६८००० रुपये प्रति किलोच्या खाली आली आहे. एक महिन्यात पहिल्यांचा चांदीचा भाव ६८००० रुपयांवरुन खाली आला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही सत्रात सोने आणि चांदीमध्ये मोठी वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भाव ५५५०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने १५०० रुपयांनी महागले आहे. तर चांदी २६०० रुपायांनी महागली. मात्र होळी सणाच्या निमित्ताने सोने चांदीचे दर घसरत असून ग्राहक दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले. तर घसरणीने सोने पुन्हा एकदा गडगडले असून ५१००० च्या जवळ आले आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम