जळगावचे कमाल तापमान लवकरच पार करणार 40 अंश
खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ | उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मैदानी राज्यांमध्ये उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. होळीचा सण जवळ येताच. उत्तर भारतात गर्मी वाढत चालली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील तापमानाबाबत भाष्य करायचे झाल्यास येथेही उष्णतेचा कहर हळूहळू जाणवत आहे. उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे,पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवलीय. जळगावचे तापमान ४० अंशावर पोहोचले आहे. रात्री व सकाळी हवेत गारवा असला तरी दुपारच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कमाल तापमान ३९ अंशाच्यावर नोंदविले गेले.
राज्यात ठिकठिकाणच्या तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा ३९ अंशांपार गेल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. २१ मार्चपर्यंत ४४ अंशांपर्यंत तापमान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज दुपारनंतर उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. तापमानापासून गारवा मिळण्यासाठी शीतपेय, उसाचा रस, ताक घेणे सुरू केले आहे. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी डोक्यावर टोपी, हातात रुमाल, महिलांनी स्कार्फ, सनकोटचा वापर सुरू केला आहे. बाजारपेठेत ग्रीननेट किंवा ताडपत्री टाकून उन्हापासून संरक्षण केले जात आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम